मुंबई : भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहली आशिया चषकादरम्यान सलामी करताना दिसू शकतो, असे त्याने म्हटले आहे. पार्थिव पटेलच्या मते, भारतीय संघाने अलीकडे अनेक सलामीवीरांना आजमावले आहे. त्याचबरोबर केएल राहुलच्या दुखापतीबाबत अनिश्चिततेची स्थिती कायम आहे. अशा स्थितीत विराट कोहली आशिया चषकामध्ये सलामी देऊ शकतो. पार्थिव पटेलने विराट कोहलीला सलामीला फलंदाजी करण्यामागे आयपीएलचे उदाहरण दिले आहे. तो म्हणाला की, कोहलीने फक्त आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी करून इतके यश मिळवले आहे. जेव्हा जेव्हा त्याने डावाची सुरुवात केली तेव्हा त्याने भरपूर धावा केल्या आहेत. त्याच्या क्षमतेबद्दल शंका नाही, फक्त त्याची लय आणि फलंदाजीची स्थिती पाहण्याची गरज आहे.
क्रिकबझवरील संवादादरम्यान पार्थिव पटेलने विराट कोहलीबद्दल मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीच्या क्षमतेबद्दल अजिबात शंका नाही. तो सध्या फक्त त्याच्या लयमध्ये नाही. याशिवाय तुम्ही त्याला कोणत्याही स्थितीत खेळायला संधी देता यावरही बरच अवलंबून आहे. याच कारणास्तव त्याच्यासाठी आशिया चषक अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. आशिया चषक केवळ कोहलीसाठीच नाही तर भारतासाठीही खूप महत्त्वाचा आहे. आगामी काळातील टी-२० विश्वचषकासाठीही याची भरपूर मदत मिळणार आहे.
इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यानंतर विराट कोहलीने बऱ्याच काळासाठी विश्रांती घेतली आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचा भाग नव्हता. त्याचबरोबर तो झिम्बाब्वे दौऱ्यावरही जाणार नाही अशी माहिती आहे. याचाच अर्थ विराट कोहली आता थेट आशिया चषकामध्ये खेळताना दिसणार आहे. टी-२० विश्वचषकापासून कोहलीने क्रिकेट खेळण्यापासून बराच ब्रेक घेतला आहे.
आशिया चषक संपुर्ण वेळापत्रक
२७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
२८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
३० ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह
३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध पात्रता, दुबई
१ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई
२ सप्टेंबर – पाकिस्तान विरुध्द पात्रता, शारजाह
३ सप्टेंबर – ब १ विरुध्द ब२, शारजाह
४ सप्टेंबर – अ१ विरुध्द अ२, दुबई
६ सप्टेंबर – अ१ विरुध्द ब१, दुबई
७ सप्टेंबर – अ२ विरुध्द ब२, दुबई
८ सप्टेंबर – अ१ विरुध्द ब२, दुबई
९ सप्टेंबर – ब१ विरुध्द अ२, दुबई
१० सप्टेंबर – फायनल, दुबई.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यावर्षी दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडणार, ‘अशा’ आहेत सामन्यांच्या तारखा!
- Cm Eknath Shinde Meets Prakash Amte | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली डॉ प्रकाश आमटे यांची भेट
- Uddhav thackeray | “… पण आता तर शिवसेना संपविण्याचाच प्रयत्न”; उद्धव ठाकरेंची नड्डा यांच्यावर टीका
- China-Taiwan Conflict | तैवान दुसरे युक्रेन बनणार? चीनने चारही बाजूने घेरले
- IND vs WI : सूर्यकुमार यादवच्या ‘या’ व्हिडिओने जिंकली लाखो क्रिकेट चाहत्यांची मने; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

