पुणे : पुणे दौऱ्यावर असताना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ.आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
https://youtu.be/7lT-brTv1lQ
प्रकृती साथ देत नसली असली तरीही या आजाराला सकारात्मकरित्या तोंड देण्याची त्यांची जिद्द आणि या परिस्थितीत देखील आयुष्य समृद्धपणे जगण्याची इच्छा त्यांच्या देहबोलीतून जाणवली. या भेटीनंतर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटूंबियांशी बोलून त्यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Subhash desai | “सामंतांवर झालेला हल्ला ही जनतेची उस्फुर्त प्रतिक्रिया”; सुभाष देसाईंकडून अप्रत्यक्ष समर्थन
- Sanjay Sirsath : उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून काढून टाकल्यानंतर संजय शिरसाठ यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
- Subhash Desai | “गद्दारी करून जर कुणी फिरतं असेल तर…” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
- Ajit pawar | उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राहणार विरोधी पक्षनेते अजित पवार
- Rohit Pawar : अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? ; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर रोहित पवारांचे सुचक ट्वीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

