Share

Uddhav thackeray | “… पण आता तर शिवसेना संपविण्याचाच प्रयत्न”; उद्धव ठाकरेंची नड्डा यांच्यावर टीका

Published On: 

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेच्याच नेत्यांनी बंड करत भाजपशी युती केली आणि राज्यात नवं सरकार आलं. त्यानंतर शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप करण्यात आला. तर काहींनी राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली असल्याचा आरोप केला. पण आता भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीच त्याबाबतच विधान केलं. ज्यावर चौफेर टीका होत आहे. त्यातच नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. “आतापर्यंत अनेकवेळा शिवसेना फोडण्याचे प्रकार झाले आहेत. पण आता शिवसेना संपविण्याचा प्रयत्न झाला आहे आणि हे स्वतः जे. पी. नड्डा यांनी बोलून दाखवले आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. जळगावहुन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.

“राजकारणात विजय-पराजय होतच असतो. पण त्यामुळे आता थेट शिवसेना संपवण्याची भाषा केली जात आहे. अशा आव्हानांना पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. तसेच पुढे ते असेही म्हणाले कि, “आपली लढाई सध्या दोन ते तीन पातळ्यांवर सुरु आहे. पहिली लढाई हि रस्त्यावर सुरु आहे आणि त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई ही कोर्टात सुरु आहे. तर तिसरी लढाई आहे सदस्य नोंदणी आणि शपथपत्राची. त्यामुळे हा विषय गंभीर असून कुणीही तो अर्ध्यात सोडू नका,” अशी भावनिक सद् त्यांनी उपस्थितांना घातली.

आज सुनावणीत काय घडले?
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली. बुधवारी न्यायालयातील सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता गुरुवारीही या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उद्याच्या सुनावणीत प्रथम एकनाथ शिंदे यांच्या वतीने वकील युक्तीवाद करणार आहेत. उद्या या प्रकरणावर प्रथम क्रमांकावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद सादर करताना वकील कपिल सिब्बल म्हणाले की, आजही शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. एकनाथ शिंदे यांना नवा पक्ष काढावा लागेल किंवा अन्य पक्षात विलीन व्हावे लागेल.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!