Share

‘आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या आणि नातू कोविड सेंटर मध्ये नाचतोय’

Published On: 

सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ही अधिक असल्याचे नोंदवण्यात आले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी व विलगीकरणासाठी ठिकठिकाणी जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारले आहेत. अशाच एका कोविड सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे ‘झिंगाट’ गाण्यावर रुग्णांसोबत थिरकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. रुग्णांचे मनोबल वाढावे, तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर ठेका धरल्याचे दिसून आले. मात्र, यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन भाजपमधील नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.

आता, भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील बोचरी टिप्पणी केली आहे. ‘आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो. स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की मी नेहमी जाऊन सेंटर मध्ये नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं २०२४ पर्यंत नाचून घ्या,’ असा प्रहार निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!