सिंधुदुर्ग : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात असतानाच पंढरपूर मध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा उडाला आहे.
एका बाजूला राज्य मोठ्या संकटाशी सामना करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना सांगितलं आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाचा पुरता विसर पडल्याचं आता समोर येतंय.
पंढरपूरची पोटनिवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली असून प्रचार सभांना देखील वेग आला आहे. एकीकडे राज्यात कोरोना वाढत असल्याने निर्बंध लावण्यात येत असताना राजकीय पक्षांना मात्र याचं भान नसल्याचं समोर येत आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेला सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणे अशा कोरोना प्रतिबंधक नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या या दौऱ्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. इतकेच नाही तर ज्या प्रचार सभेत त्यांनी भाषण ठोकलं, त्या सभेत शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित असल्याचं समोर आलं आहे.
जे मंत्री नियम मोडतात तेच मंत्रिमंडळ बैठकीत lockdown चे निर्णय घेणार??? हे कितपत योग्य आहे?? ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे पूर्ण बोगस कारभार. मुख्यमंत्र्याना त्यांच्याच पक्षातली लोकं व त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री गांभीर्याने घेत नाही हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असेल. pic.twitter.com/8hKiNzoOdV
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 4, 2021
या घटनेवर भाजप नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. ‘जे मंत्री नियम मोडतात तेच मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊनचे निर्णय घेणार??? हे कितपत योग्य आहे?? ठाकरे सरकारचा कारभार म्हणजे पूर्ण बोगस कारभार. मुख्यमंत्र्याना त्यांच्याच पक्षातली लोकं व त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री गांभीर्याने घेत नाही हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असेल.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोकणात जाणाऱ्या प्रत्येकासाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करा – राऊत
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- अशोक चव्हाणांनी केला भाजपचा सुफडासाफ; चिखलीकरांचा गड ढासळला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

