नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा एकहाती विजय झाला आहे. २१ पैकी १७ जागांवर महाविकास आघाडीने काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळवला आहे. तर, भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठा झटका बसला आहे. चिखलीकर व त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला तरी बँकेतील सत्ता मात्र गमवावी लागली आहे.
या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.’ असं भाष्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे.’
यासोबतच, त्यांनी विरोधकांना देखील लक्ष्य केलं आहे. ‘जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा मला विश्वास आहे,’ असं देखील ते म्हटले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- मोठी बातमी : लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’


