मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांमध्ये टॉप-१० जिल्ह्यांमध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.
तर, शनिवारी राज्यात ४९ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडल्यामुळे राज्याची स्थिती ही बिकट होत चालली आहे. एकीकडे, राज्यात लॉकडाऊन वा कडक निर्बंध लावण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना कोकणात जाणाऱ्या प्रत्येकासाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करा अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून अनेक नागरिक हे कोकणात जात असतात यामुळेच त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी केली आहे. ‘काही चाकरमानी बेफिकीरपणे कोकणात जातात, हे धोकादायक आहे. याचा त्रास तिथल्या आरोग्य यंत्रणांवर पडेल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असावं. त्याशिवाय लसीकरण गरजेचे करावे. त्याशिवाय गावात प्रवेश देऊ नये.,’ अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.
सहकार्य करा, उद्धव ठाकरेंचे विरोधी पक्षांना आवाहन –
विरोधी पक्षांनी कोरोना आळा घालण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- अशोक चव्हाणांनी केला भाजपचा सुफडासाफ; चिखलीकरांचा गड ढासळला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

