🕒 1 min read
मुंबई : ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी त्यांनी, ‘मी चांगली कार चालवतो की नाही माहीत नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतो आहे,’ असं विधान केल्यानंतर उपस्थितांमध्ये हाशा पिकला होता.
‘मी उत्तम गाडी चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरी सुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘जुने मित्र’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशा रितीने चालवता येत नाही. सरकारमध्ये ट्रॅफिक सुरुच राहते. या सर्व गोष्टींबद्दल जनता त्यांना योग्य उत्तर देईल,’ असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, याआधी देखील सरकारच्या स्टेअरिंगवरून भाजप व शिवसेनेमध्ये टिकासत्र रंगल्याच दिसून आलं होतं.
उद्धवजी फार चांगली कार चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार.@Dev_Fadnavis pic.twitter.com/yOirLRQOhq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही, मी स्वच्छ चारित्र्याचा आहे : राहुल गांधी
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे येणार एकत्र; मुंबईच्या महापौर राज ठाकरेंच्या भेटीला
- ‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
