Share

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण, कोल्हापूर नंतर आज सांगली जिल्ह्यातील पुरबाधित भागांची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेला आता चार दिवस उलटूनही पूरग्रस्त नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नाही.

मंत्री उदय सामंत यांनी पूरग्रस्तांच्या खात्यावर मंगळवारी 5 हजार रुपये जमा होतील असं सांगितलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली आहे.

‘‘काय पाप केलंय कोकणाने शिवसेनेला निवडून देऊन, 10 हजार रुपयांसाठी तडफडायला लावतायत. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाला 10 हजार पण एका झटक्यात नाही तर इंस्टॉलमेंटमध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांच्या दौऱ्यावर जो खर्च होतो तितकी पण मदत नुकसानग्रस्तांना मिळत नाही’, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!