सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे.
आता लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला केली आहे. उच्च न्यायालयात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं आहे. ‘कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत करण्याबाबत आदेश काढला जाईल. मात्र, पहिल्या टप्प्यात सामान्यांसाठी लोकल सुरु करणं कठीण आहे. तूर्तास तरी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु केली जाणार नाही,’ असं ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने सूचना केल्यानंतर लसीकन झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासामध्ये मुभा मिळण्याची निर्माण झालेली अपेक्षा भंगली आहे.
उच्च न्यायालय काय म्हटले ?
सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राज्य सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत वेगळी स्थिती आहे. त्यामुळे वकीलच नाही तर अन्य क्षेत्रांतील लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा उपलब्ध करण्याबाबत विचार करण्याची सूचना यावेळी केली. तर, गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी देखील निर्णय होण्याची शक्यता असून उच्च न्यायालयाने तसे आदेश दिल्यास राज्य सरकारला देखील यासाठी हिरवा कंदील द्यावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- मुख्यमंत्री ठाकरेंनी उल्लेख केलेला ‘तो’ कठोर नियम नक्की कोणता ? सांगलीत ठाकरे म्हणाले…
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

