सोनीपत:- केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग आठव्या दिवशी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. दरम्यान, दिल्ली हरीयाणाच्या सिंघु सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकारी शेतकऱ्यांची कोविड चाचणी करण्याचे आदेश सोनीपतचे जिल्हा दंडाधिकारी श्यामलाल पुनिया यांनी दिलेत.
सीमेवर आंदोलनात ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांपैंकी अंगात ताप असलेल्या शेतकऱ्यांची एक यादी तयार करण्याचे निर्देश पुनिया यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा शेतकऱ्यांची मोफत कोविड चाचणी केली जाणार आहे. कोरोना संक्रमित आढळल्यास अशा शेतकऱ्यांना मोफत सोई-सुविधा आणि उपचार पुरवले जातील.
पुनिया यांनी बुधवारी परिस्थितीची समीक्षा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत. कोरोना काळात आंदोलनासाठी मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेतही भर पडलीय. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आरोग्याची चाचपणी करणं अत्यंत आवश्यक ठरतंय.
महत्वाच्या बातम्या
काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय…
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
‘औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविणार’ खा. जलील यांचा दावा…
काँग्रेसच्या मतदारांचे क्रॉस व्होटिंग; भाजपच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय
‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया झळकणार आता वेब सिरीजमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

