Share

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया झळकणार आता वेब सिरीजमध्ये 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ची  लाडकी तसेच आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे आता मराठी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ‘बायकोला हवं तरी काय’ असे या वेबसीरिजचे नाव असून याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केले आहे.

यात श्रेया गृहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. श्रेया म्हणाली, माझे पात्र एका गृहिणीचे आहे जिला आपल्या पतीसाठी आणि स्वत:साठी सर्वात चांगलं असं सगळं हवं आहे. या सिरीजमध्ये नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील.

प्रेक्षकांच्या 100 टक्के मनोरंजनाची मी खात्री देते. एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनलची सहा भागांचीं ही वेबसिरीज 4 डिसेंबरपासून एमएक्स प्लेअरवर पाहता येईल. प्रेक्षकांना खळखळून हसवून पेक्षकांच्या मनात घर बनवणारी श्रेया आता वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रेया या सीरिज मधून आपली वेगळी छाप कशी निर्माण करते हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!