Share

‘माझी कालची खेळी माही भाईच्या पॅटर्ननुसारच’, जडेजाने सांगितले कालच्या विजयाचे गुपित

Published On: 

India vs Australia : कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजाच्या धमाकेदार खेळीच्या बळावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सुरुवातीला भारताचे फलंदाज एका-मागे एक तंबूत परतले. यामुळे मालिका तर आधीच गेली असताना ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप देणार अशी शक्यता निर्माण झाली होती.यानंतर, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 289 धावांवरच रोखत १३ धावांनी विजय मिळवला.

जडेजानं तिसऱ्या सामन्यातील दमदार कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंग धोनीनं सेट केलेल्या पॅटर्नला दिले. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले.

जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर जडेजानं धोनीनं सेट केलेल्या पॅटर्नवर मत व्यक्त केले.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा फंडा वापरलास का? असा प्रश्न विचारला. त्यावर जडेजा म्हणाला,”हो नक्कीच माही भाई प्रदीर्घकाळ टीम इंडियासाठी आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. आणि त्यानं एक पॅटर्न सेट केला आहे.

तो कोणत्याही खेळाडूसोबत प्रथम भागीदारी सेट करतो आणि खेळपट्टीवर तग धरल्यानंतर तो फटकेबाजी करायचा. तो नेहमी सल्ला द्यायचा की भागीदारी सेट झाल्यावर सामन्याच्या अखेरच्या षटकांत जबरदस्त फटकेबाजी कर. त्याला असं करताना मी अनेकदा पाहिले होते आणि त्याच्यासोबत मी अनेकदा खेळलो आहे. तो नेहमी सांगायचा, आपण सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला तर अखेरच्या चार-पाच षटकांत धावा येणारच.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!