Share

Nilesh Rane | “उद्धव ठाकरेंना लॉलीपॉप चिन्ह द्या, धनुष्यबाण शोभणारं नाही”; निलेश राणेंची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकीकडे खरी शिवसेना कुणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. तर दुसरीकडे सध्या शिवसेनेचे असलेले पक्ष चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे कुणाकडे जाणार हा वाद देखील सुरु आहे. दोन्ही गट ‘शिवसेना’ या नावावर आणि धनुष्यबाणावर हक्क सांगत आहेत. तसेच कायदेशीररित्या या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नही करत आहेत. यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

निलेश राणे माध्यमाशी बोलताना म्हणाले कि, “हा वाद सध्या न्यायालयात सुरु आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते मवाळ आहेत. बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, तसं त्या माणसाला मिळायला हवं. पण आता ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण ते स्वतःच म्हणतायत आता सगळे बाण निघून गेले. हे फक्त रिकाम टेकडे धनुष्य घेऊन बसलेत. त्यांना ते चिन्ह शोभणारं नाही. या चिन्हासाठी कुणीतरी रफटफ माणूस पाहिजे. जसे बाळासाहेब होते. त्यांना शोभायचं ते चिन्ह. यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल, धनुष्यबाण शोभणारं नाही.”

तसेच पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्लीही उडवली. “उद्धव ठाकरेंनी फुटलेला पेपर सोडवला आहे. संजय राऊतांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कौशल्याच्या जोरावर काही प्रश्न विचारले आणि ठाकरेंनी त्यांची थेट उत्तरं दिली, असं काही नाही. प्रश्नही आधीच माहित होते आणि त्यांची सडलेली उत्तरंही माहित होती.”, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!