सिंधुदुर्ग : काल स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसह राज्याला संबोधित केलं. यावेळी देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांची थोडी गफलत झाली. देश स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याचं ते म्हणाले.
यानंतर त्यांच्यामागे अभे असलेले राज्याचे मुख्य सचिव सिताराम खुंटे यांनी अमृत महोत्सवी असं म्हटलं. मग लगेचच उद्धव ठाकरेंनी चूक दुरुस्त केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिन ‘हीरक महोत्सवी’ आहे की ‘अमृत महोत्सवी’ हे सुद्धा माहित नाही, काय मुख्यमंत्री भेटलाय राव… मागचा अधिकारी म्हणत असेल झक मारली आणि अधिकारी झालो,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिन 'हीरक महोत्सवी' आहे की 'अमृत महोत्सवी' हे सुद्धा माहित नाही, काय मुख्यमंत्री भेटलाय राव… मागचा अधिकारी म्हणत असेल झक मारली आणि अधिकारी झालो. pic.twitter.com/uQLBAF9HdD
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नेमकं कोणत्या गोष्टींवर भाष्य केलं ?
कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून आपण सर्वांना काळजी घ्यायची आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता साथ आटोक्यात असली तरी आपल्याला अजूनही संपूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. ऑक्सीजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. पण तरीही आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ऑक्सीजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे यापुढेही कटाक्षाने पालन करावे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुणे कुण्याच्या बापाचं नाही’; मनसेच्या इशाऱ्याला कोकाटेंनी दिलं प्रत्युत्तर, वाद वाढणार ?
- छत्रपती शिवरायांबद्दल जेवढे तुम्ही वाचले नसेल, तेवढे मी ५० वर्षांपूर्वी वाचलेय–राज्यपाल कोश्यारी
- ‘महात्मा गांधी बोलायचे ते करायचे देखील, पण आज आपल्याकडे..’ राहुल गांधींची मोदींवर टीका
- ‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले
- पुन्हा धुवाधार! राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

