Share

छत्रपती शिवरायांबद्दल जेवढे तुम्ही वाचले नसेल, तेवढे मी ५० वर्षांपूर्वी वाचलेय–राज्यपाल कोश्यारी

Published On: 

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ती दिवसीय पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. आज नियोजित दौऱ्यात असलेल्या सिंहगडाला त्यांनी भेट देत पाहणी केली. तसेच शिवराय आणि तानाजी मालुसरेंना त्यांनी अभिवादन केलं. वयाच्या ८० व्या वर्षी कोश्यारी यांनी चालत सिंहगड सर केला. सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे यावेळी राज्यपालांनी दर्शन घेतलं

यावेळी राज्यपालांनी आपण शिवाजी महाराजांबद्दल ५० वर्षांपूर्वी वाचन केल्याचं सांगितले. ‘मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल. कारण शिवाजी हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत’, असे ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले. ‘शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे नायक आहेत. देशातील मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवल जायला हवे. असे झाले, तर आपल्या देशातील मुले देखील तानाजी मालुसरे होऊ शकतील, शिवाजी होऊ शकतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘माझ्या राजकीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती, बुद्धी, शक्तीच गुणगान इतिहासकारांनी केलं आहे. युक्ती बुद्धी शक्तीने राज्य केलं. शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आहे. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलांना समजला पाहिजे, तो शिक्षणात आला पाहिजे. आपली मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजेत असे’ माहिती राज्यपालांनी दिली.

दरम्यान, सिंहगडावर राहणाऱ्या नागरिकांनी राज्यपाल येणाऱ्या मार्गावर रांगोळ्या काढून तर एका ठिकाणी काही महिलांनी त्यांची आरती ओवाळून स्वागत केले. यावेळी ‘कसे आहात तुम्ही, आमच्या उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे…’ अशा शब्दात नागरिकांची विचारपूस केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!