Share

प्रियंका गांधींच्या ‘त्या’ आरोपांवर केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सरकार त्यांच्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींच्या (Priyanka Gandhi) आरोपांवर सपष्टीकरण दिले आहे.

मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या आरोपांची दखल घेत याप्रकरणी, सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता .त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने प्रियंका गांधी वड्रा यांच्या मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी छेडछाड केली गेली नाही. त्यांनी सरकारवर केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एका रॅलीदरम्यान प्रियांका गांधी यांनी सरकारवर आरोप केला होता की ते आता काही काम करत नाहीत तर माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करत आहेत. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाच्या चौकशीची चर्चा केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रियंका गांधी यांच्या दाव्याची दखल घेत चौकशी सुरू केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!