मुंबई: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आणि आजही मुख्यमंत्री उद्धव ठकरे उपस्थित राहतील की, नाही यावर अजून तरी स्पष्ट माहिती मिळालेली नाहीये. दरम्यान यावरूनच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली आहे.
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना? प्लीज, प्लीज, प्लीज राज्यभर दौरे कराल का? असा टोला संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत लगावला आहे.
मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्य भर फिरले तर काय मज्जा येईल ना?pl, pl, pl राज्य भर दौरे कराल का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 23, 2021
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या तब्येतीला त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता गूळगूळीत करण्यात आला. मला यावर काही वावगे नाही. मात्र जर या कारणाने जर राज्यातील रस्ते खड्डे विरहित होत असतील तर मुख्यमंत्र्यांनी राज्यभर दौरे करावे, निदान त्या कारणाने तरी सुधारणा होईल. आज कोकणात गेलं तर तीच अवस्था आहे. विदर्भात गेलं तर तीच अवस्था आहे. मराठवाड्यात गेलं तरी तीच अवस्था आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री म्हटले की, मी राज्यभर दौरे करणार आहे तर रस्ते ठीक होतील. त्यांच्या नुसत्या घोषणेने रस्ते ठीक होतील. असा खोचक टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- प्रियंका गांधींच्या ‘त्या’ आरोपांवर केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांची तक्रार; ‘त्या’ ट्वीटमुळे शिवसैनिक आक्रमक


