Share

‘स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली’; निलेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी 31 ऑगस्टला त्यांनी चौकशीसाठी उपस्थित राहावं, असं त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते.

दरम्यान, आज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतर अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

दरम्यान, दोन समन्स बजावण्यात आले असून अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही असं सांगत चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असं देखील ते म्हणाले. चौकशीत मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं दिली जातील. मला अजूनही चौकशीसाठी का बोलावलं आहे हे मला माहिती नाही. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल”, असं ते म्हणाले.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला भाजपनेते निलेश राणे यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, चूक झाली नाही म्हणून चौकशीला सामोरं जातोय पेक्षा चौकशीला सामोरं गेलो नाही तर भलताच घोडा लागेल म्हणून. आता कुठे चौकशी सुरू झाली आहे आणि आत्ताच स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली असा टोला राणे यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!