Share

चहरने केला कहर; चेन्नईचा पंजाब किंग्सवर ‘सुपर’ विजय

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलमध्ये गुणतालीकेत खाते उघडले आहे. यंदाच्या सत्रातील चेन्नईचा हा पहिला विजय आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार धोनीचा हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थक ठरवत अवघ्या २६ धावावर पंजाबचा अर्धा संघ तबुंत माघारी पाठवला. पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकात ८ गडी गमावत १०६ धावा केल्या. चेन्नईकडुन दिपक चहरने भेदक गोलंदाजी करत ४ षटकात अवघ्या १३ धावा देत ४ महत्वाचे गडी बाद केले. महत्वाचे म्हणजे चहरने एक षटक निर्धाव टाकले. तर पंजाब कडुन युवा खेळाडू शाहरुख खान याने सर्वाधिक ४७ धावा केल्या.

सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर ऋुतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाल्यानंतर सलामीवीर ड्युप्लेसीस आणि मोईन अली यांनी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या दारात आणले. विजयाची औपचारीकता बाकी असताना चेन्नईने मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू हे चुकीचा फटका खेळुन बाद झाले. त्यानंतर सॅम करनने अधिक पडझड न होऊ देता सोळाव्या षटकात चेन्नईला विजयी केले. चेन्नईकडुन मोईन अलीने ७ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर दिपक चहरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!