औरंगाबाद : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून लॉकडाऊन काळात उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दि.१६ न.प.मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाNया नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली.
यावेळी मास्क न वापरणाNया लोकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाNयांवर मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी व त्यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ५० जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली. तसेच १०० वाहनांधारकांवर व विनामास्क १२५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हि कारवाई न.प.चे अव्वल कारकुन व्यांक्टी पापुलवार, मुकुंद महाजन, अश्विन गोजरे, किशोर लांडगे, बाबासाहेब बर्पेâ, प्रितेश घोडके, गणेश सानप यांच्या पथकाने केली. तसेच या प्रसंगी नगरसेवक ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, इरफान बागवान, सोमनाथ परळकर, बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके यांची उपस्थीती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- खळबळ! सचिन वाझे आणखी दोघांचे करणार होता एन्काऊंटर, ‘या’ मोठ्या व्यक्तीचे वाचले प्राण
- रेमडेसिविरसाठी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे एक तास धरणे आंदोलन
- पैठणकरांनो सावधान ! विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट ; २ पॉझिटीव्ह
- आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा ; ससूनमध्ये एका बेडवर तीन रुग्णांवर उपचार
- तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या मदतीसाठी माजी मंत्र्याचा आग्रह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

