औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ केला. शहरात आजवर ११ हजार १८१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस सोमवारी (दि. १५) पासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुुसऱ्या टप्प्यात केवळ १९० जणांनी दुसरा डोस घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे या टप्प्यातही थंड प्रतिसाद असल्याचे दिसून येते.
१५ फेब्रुवारी पासून कोरोना लसीकरण होऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्याचे लसीकरण करण्यात येत आहे. काल मेडीकव्हर हॉस्पिटल येथे शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. परदेशी यांनी दुसऱ्या टप्प्याची लस घेऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ मेघा जोगदंड, डॉ टाकळीकर आणि इतर खाजगी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना लस घेतली. काल एकूण १९० लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. यावेळी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणासाठी २४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. पुणे येथील सिरम कंपनीकडून कोविशिल्ड लसीचे डोस पुरविण्यात आल्यानंतर १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शहरात पालिकेने लसीकरणासाठी धूत, बजाज, हेडगेवार, एमजीएम, मेडीकोव्हर या पाच रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु केले. आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू असताना आरोग्य विभागाकडून कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणारे पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा डोस देण्यास फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एमएस धोनी चित्रपटात सुशांत सोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने संपवलं जीवन
- तरूण उद्योजक बेपत्ता; घरी सोडली आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी
- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्द ठार; बायपासवरील निशांत पार्कसमोरील घटना
- मागितले होते काय अन मिळाले काय? आकृतीबंधावरुन औरंगाबाद पालिकेची घोर निराशा
- टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्रात देखील धागेदोरे; बीडमधला संशयित फरार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

