🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. नुकतीच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण यांचे कुटुंबीय दबावात असल्याची चर्चा सुरु असताना या प्रकरणात पोलीस दबावात असल्याचा संशय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.यानंतर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच त्यांच्या राजीम्याची देखील मागणी जोर धरत होती. या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने चांगलीच लावून धरली होती. अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे, टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या. यात शिवसेनेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं, मातोश्रीवर आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे.
संजय राठोड यांच्या या राजीनाम्यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत संजय राठोड यांच्या अटकेची मागणी केली आहे. ‘वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा. परंतु केवळ राजीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी’. अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा.
परंतु केवळ राजीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. pic.twitter.com/8zEC6kUjTd— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 16, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं’
- वादग्रस्त प्रायव्ह्सी पॉलिसीनंतर व्हॉट्सऍपचे भन्नाट फिचर येणार
- संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- राम मंदिरासाठी देणग्या न देणाऱ्यांची नावे आरएसएस गोळा करत आहे ?
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
