Share

शेअर बाजारात नवा उच्चांक, निफ्टी पहिल्यांदाच १६,६१४ पातळीवर बंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसभराच्या चढ-उतारादरम्यान अखेरच्या तासामध्ये झालेल्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार सकारात्मक वाढीसह बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ५५,८५४.८८ अंकाच्या पातळीपर्यंत तर निफ्टीने १६,६२८.५५ अंकाच्या विक्रमी पातळीपर्यंत उसळी घेतली होती. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स २०९.६९ अंकाच्या वाढीसह ५५,७९२.२७ पातळीवर तर निफ्टी ५१.५५ अंकाच्या वाढीसह पहिल्यांदाच १६,६१४.६० या पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० प्रमुख शेअरपैकी २० शेअर वाढीसह तर १० शेअर लाल निशानीवर बंद झाले. यामध्ये टेक महिंद्राचे शेअर ३.२१ टक्के तर टीसीएसचे शेअर २.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये १.८३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील निर्देशांकात २.५७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मुंबई शेअर बाजारातील ३,२८८ शेअरमध्ये व्यवहार झाले असून यातील १,१४१ शेअर तेजीसह तर २,०२७ शेअर लाल निशानीवर बंद झाले. याच बरोबर लिस्टेड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप २४०.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी देखील मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली होती. सोमवारी सेन्सेक्स १४५ अंकांच्या तर निफ्टी ३३.९५ अंकाच्या वाढीसह बंद झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!