औरंगाबाद : अखेर औरंगाबादकरांची नवीन दिल्ली विमानसेवेची प्रतीक्षा संपली आहे. ‘स्पाईस जेट’तर्फे दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारपासून (ता. आठ) नियमित औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. यामुळे आता शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.
देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसायवाढीसाठी औरंगाबादहून नवीन विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ जूनमध्ये दिल्लीला गेले होते. या शिष्टमंडळाची बैठक स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाइन्सच्या व्यवस्थापकीय समितीसोबत झाली होती.
यावेळी दोन्ही विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून नव्या विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यानंतर चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला 27 जूनला स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सोयीसुविधा आणि प्रवासी क्षमतेचा आढावा घेतला होता. स्पाईस जेटकडून दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
15 ऑगस्टपासून सेवा सुरू होईल असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात ही प्रतीक्षा संपली असून, स्पाईस जेटने दिल्ली औरंगाबाद सेवेला सुरवात केली आहे. यामुळे दिल्ली जाणाऱ्या उद्योजक, व्यापारी, राजकीय नेते पदाधिकारी आणि नागरिक व पर्यटकांची सोय झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181557575877160960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181571959991218180?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

