Share

शरद पवारांच्या ‘त्या’ टिकेला चंद्रकांत पाटील पुण्यातूनचं उत्तर देणार ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीमध्ये झालेल्या भाजप संसदीय कमिटीच्या बैठकीत उमेदवारांची पाहिली यादी निश्चित झाली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातुन लढणार आहेत. पाटील यांना उमेदवारी देताना विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना चुचकारले आहे. आजवर अनेकवेळा पवार यांनी ‘जनतेतून निवडणूक न लढवले’ अशी टीका पाटील यांच्यावर केली आहे. आता विधानसभेच्या निमित्ताने चंद्रकांत दादा हे पवारांच्या टिकेला आपल्या विजयातून उत्तर देणार असल्याचं बोलले जात आहे.

दरम्यान, भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कोथरूडमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हमखास निवडून येणार मतदारसंघमधून भाजप नेते या मतदारसंघाकडे पाहता आहेत.

पुणे शहरातील भाजपचे संभाव्य उमेदवार

1. हडपसर – योगेश टिळेकर

2. पुणे छावणी – सुनील कांबळे

3. पर्वती – माधुरी मिसाळ

4.शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

5. कोथरूड – चंद्रकांत पाटील

6. खडकवासला – भीमराव तापकीर

7. वडगाव शेरी – जगदीश मुळीक

8. कसबा मुक्ता टिळक

महत्वाच्या बातम्या 

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178512133102788608?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178507478981439488?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178309855284621312?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!