Share

न्युझीलंडच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटुची प्रकृती चिंताजनक, लढतोय आयुष्याची लढाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : न्युझीलंड क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले. यात अष्टपैलु खेळाडुंच्या नावात एक नाव आघाडी वर आहे. ते म्हणजे ख्रिस केर्न्स. मात्र आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चांगल्या चांगल्या गोलंदाजाची धुलाई करणारा ख्रिस सध्या आयुष्याची लढाई लढत आहे.

न्युझीलंडचा माजी अष्टपैलु खेळाडू ख्रिस केर्न्सची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. सध्या तो लाईफ सपोर्ट सिस्टमवर आहे. यादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ख्रिसच्या धमणीच्या आतील थर फाटल्यामुळे त्यालाश्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे त्याला मागील आठवड्यात कॅनबेराच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर ख्रिसवर शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली आहे. यामुळे त्याला सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले.

ख्रिस केर्न्स न्युझीलंडकडून ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय सामने खेळलेला आहे. १९८९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ख्रिसने कसोटीत ३,३२० आणि एकदिवसीयमध्ये ४,९५० धावा केल्या आहेत. यात त्याने ९ शतक आणि ४८ अर्धशतके केली आहेत. तर गोलंदाजीत त्याने कसोटीत २१८ आणि एकदिवसीयमध्ये २०१ गडी बाद केले आहे. मात्र निवृत्तीनंतर त्याच्या कारकिर्दीला फिक्सींगचे गालबोट लागले. हे आरोप जरी सिद्ध होऊ शकले नाही तरी, त्याची आर्थिक परिस्थीती खालावली होती. या काळात त्याने स्थानिक नगरपालीकेचे ट्रक चालवावे लागत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!