🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू जय्यत तयारी करताना दिसत आहेत.
मात्र, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी न्यूझीलंड संघातील हेनरी निकोल्सने आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केला. सध्या या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. न्यूझीलंडचा खेळाडू हेनरी निकोल्स याने आपल्या विवाहाची माहिती इंन्स्टाग्रामवर दिली आहे. आपल्या लग्नाचे देखील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/CPMP4SStm7p/?utm_source=ig_web_copy_link
मिस्टर आणि मिसेस निकोलस असं कॅप्शन देखील त्याने या फोटोला दिले आहे. या फोटोमध्ये दोघेपण फार आनंदी दिसत आहेत. त्याच्या फोटोवरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा
- आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर
- पदोन्नती आरक्षण : सरकारमधील वाद टोकाला, कॉंग्रेस मंत्र्याने दिला थेट ‘हा’ इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
