Share

आयपीएल स्थगितीमुळे भारतीय संघाला होणार ‘असा’ फायदा- रॉस टेलर

Published On: 

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले. याच सामन्याच्या पार्श्वभूमिवर न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज रॉस टेलरने भारतीय संघाबाबत एक मोठे विधान केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत न्युझीलंडचा आघाडीचा फलंदाज रॉस टेलरने भारतीय संघासाठी आयपीएल स्पर्धा स्थगित होणे फायदेशीर होते असे वक्तव्य केले आहे. यावेळी तो म्हणाला,’जर आयपीएल स्पर्धा पुर्ण झाली असती तर भारतीय संघाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसता. मात्र आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारतीय संघाकडे सराव करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज सराव करुन चांगली तयारी करु शकतात.’ असे म्हणाला.

यावेळी बोलताना पुढे रॉस टेलर असेही म्हणाला की,’जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापुर्वी इंग्लंडविरुद्धची २ कसोटी सामन्याची मालिका आमच्या संघासाठी नक्कीच खुप फायदेशीर ठरणार आहे. तटस्थ ठिकाणी हा सामना होणे अगदी गरजेचे होते’ असेही रॉस टेलर यावेळी म्हणाला. मात्र यावेळी भारतीय संघ हा बऱ्याच कालावधीपासून चांगली कामगीरी करत आहे आणि त्यांचा संघ हा क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तेव्हा त्यांना कमी लेखणे चुकीचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!