Share

आयपीएलच्या लिलावानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूला पडलेला प्रश्न, १५ कोटी म्हणजे किती?

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. यातच दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

परंतु, न्यूझीलंडच्या कायेल जेमिसनवर फार मोठी बोली लागेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्याला संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात स्पर्धा होती. अखेर त्याला तब्बल १५ कोटी रुपयांत आरसीबी संघाने खरेदी केले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये न्यूझीलंडचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, त्याला १५ कोटी रुपये म्हणजे नक्की किती असतात हे ठाऊक नव्हते.

आयपीएल लिलाव सुरु असताना न्यूझीलंडमध्ये रात्र होती. मी उठून माझा फोन बघितला. काही खेळाडूंना लिलाव यला आवडत नाही. त्यांना भीती वाटते. परंतु, मी तो पाहण्याचा निर्णय घेतला. एक-दीड तास माझे नाव लिलावासाठी आले नाही. आरसीबीने मला खरेदी केल्यानंतर शेन बॉंडने मला मेसेज केला. परंतु, अगदी खरे सांगायचे तर १५ कोटी रुपये म्हणजे न्यूझीलंड डॉलर्समध्ये किती असतात, हे मला ठाऊक नव्हते. मात्र, मला लिलाव पाहताना मजा आली, असे जेमिसन म्हणाला. १५ कोटी रुपये म्हणजे २८ लाख ३४ हजार ३४४ न्यूझीलंड डॉलर्स होतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!