Share

जालना जिल्हा रुग्णालयात ओपीडीनंतर आयपीडीही सुरू; शस्त्रक्रिया विभागही सुरू होणार

Published On: 

जालना : जिल्हा रुग्णालयातील ओपीडीनंतर आता आयपीडी (आंतररुग्ण विभाग) देखील रुग्णालयाच्या मुळ इमारतीत स्थलांतर झाला आहे. तसेच, शस्त्रक्रिया विभागही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

कोरोनामुळं जिल्हा सामन्य रुग्णालय मुळं इमारतीतून तात्पुरत्या स्वरूपात शहरातील गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील धर्मशाळा आणि नवजात बालरोग कक्षाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी केवळ ओपीडीवर भर होता. रुग्ण अॅडमिट केल्यावर त्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालय मुळ इमरातीत स्थलांतरीत करावे अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईकांडून करण्यात येत होती.

दरम्यान, जिल्हा सामन्य रुग्णालयाच्या इमारतीची डागडुजी आणि नुतनीकरणाचे काम सुरू आहे. तब्बल सहा महिन्यांपासून हे काम धिम्या गतीने सुरू असल्याने रुग्णालयातील आयपीडी व शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यास विलंब झाला. मात्र, रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आयपीडी (आंतररुग्ण विभाग) व ओपीडी (बाह्य रुग्णविभाग) सुरू करण्यात आली आहे. ज्या वार्डाचे काम पूर्ण झाले किंवा अंतिम टप्प्यात आहे त्याठिकाणी उपचाराखाली रुग्ण ठेवण्यात येत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!