मुंबई : काल राज्यासह देशभरात शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. शिवभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळला असला तरी कोरोनाचं सावट असल्याने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं होत.
दरम्यान आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते. यावरच भाजपने जोरदार टीका केली आहे. सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असं म्हणंत भाजपने निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही काल शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटो देखील शेअर केले. त्यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं आहे.
नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा… स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लावून अटक करायचं, अशी टीका करतानाच नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय!, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.
नाना च्या नाना तऱ्हा!!
'सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!
हाच आहे काँग्रेस चा तमाशा…
स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लाऊन अटक करायचं!
नानाजी मांजरा सारखं वागताय डोळे मिटून सगळे नियम मोडताय! pic.twitter.com/9No51yz9rZ— Prasad Lad (@PrasadLadInd) February 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- टूलकिट प्रकरण, दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

