Share

ऐश्वर्या नाही राणी मुखर्जी झाली असती ‘बच्चन’ कुटुंबाची सून, ‘या’ व्यक्तीमुळे दोघांचे ब्रेकअप…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज राणी मुखर्जीचा ४४ वा वाढदिवस. राणीनं तिच्या करिअरमध्ये एक पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री राणी मुखर्जी देखील ओळखली जाते. एकेकाळी राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती. अर्थात काही काळानं त्यांचं ब्रेकअप झालं आणि या दोघांमधील संबंध एवढे बिघडले की बच्चन कुटुंबीयांनी राणीला अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नव्हतं. जाणून घेऊयात नेमकं काय कारण होतं की या दोघांचं ब्रेकअप झालं.

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. पण नंतर करिश्माची आई बबिता कपूर आणि बच्चन कुटुंबीय यांच्यात काही कारणानं दुरावा आला आणि तो नंतर वाढत गेला. अखेर करिश्मा आणि अभिषेक यांचा ठरलेलं लग्न मोडलं. त्यानंतर अभिषेक आणि राणी यांच्यातील जवळीक हळूहळू वाढू लागली. राणीचं अभिषेकवर खूप प्रेम होतं असंही म्हटलं जातं.

राणी मुखर्जीला जया बच्चन यांचा होकार होता. पण नंतर जया बच्चन यांनीच राणी आणि अभिषेक यांच्यातलं नातं संपवलं असं बोललं जातं. याचं कारण म्हणजे त्यावेळी संजय लीला भन्साळी यांचा हिट चित्रपट ब्लॅकमध्ये राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात राणी आणि अमिताभ यांचा एक किसिंग सीन होता. ज्यावर जया बच्चन यांनी आक्षेप घेतला होता. आपल्या होणाऱ्या सूनेनं अशाप्रकारचा सीन सासऱ्यासोबत चित्रत करणं जया यांना मान्य नव्हतं. मात्र राणीनं या सीनला होकार दिला होता. त्यामुळे राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!