Share

VIDEO : पाकिस्तानविरुद्ध बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला आला राग; पाहा नक्की झालं तरी काय!

Published On: 

मुंबई : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांची पहिली विकेट ८ धावांवर पडली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ७ धावा करून बाद झाला. यानंतर मार्नस लाबुशेनलाही खाते उघडता आले नाही. ८ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला. ऑस्ट्रेलियन डावाला सजवताना त्याने अर्धशतक झळकावले. स्मिथने उस्मान ख्वाजासोबत १३८ धावांची भागीदारी करत कांगारू संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून सोडवले. सामन्यादरम्यान एक वेळ अशी आली होती जेव्हा स्मिथ खूप संतापलेला दिसत होता.

स्टीव्ह स्मिथ त्याच्या अर्धशतकादरम्यान चिडलेला दिसत होता, जेव्हा सीमारेषेजवळ ठेवलेल्या रोबोटिक कॅमेराने त्याची एकाग्रता भंगवली. त्याचा राग कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना ११व्या षटकात घडली. रोबोटिक कॅमेरा सतत हलत असल्याने स्मिथ भडकला.

स्मिथचा हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ८ धावांत २ विकेट पडल्यानंतर कांगारू संघ दडपणाखाली होता. अशा स्थितीत स्मिथने उस्मान ख्वाजासोबत उत्तम भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत आणले. स्मिथ १६९ चेंडूत ५९ धावा करून बाद झाला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ६ चौकार लगावले.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!