🕒 1 min read
दिल्ली : इयत्ता बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली आहेत. ती विचारात घेऊन येत्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं होतं. दरम्यान, CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
परंतु आता बारावीच्या परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही बैठक घेणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. आज संध्याकाळी ही बैठक होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारावीची परीक्षा कशी घ्यायची, याबाबतच्या पर्यायांवर सर्व राज्यातील शिक्षणमंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत काही महत्वाचा निर्णय घेणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- काल पवारांची भेट, आज फडणवीसांनी गाठलं मुक्ताईनगर; चंद्रकांत पाटील म्हणाले…
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- ‘ठाकरे आणि पवारांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करुन मी त्या पूर्ण करुन घेईन’

