🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार केल्यानंतर आता काही परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु या संकटाला सामोरे जात असतानाच सध्या देशावर आणि राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील कोरोनाची लाट काहीशी ओसरत असल्याचं चित्र असलं तरी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत राज्यात म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. तशी माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यात एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचे दररोज 20 हजार डोस लागत आहेत. अशावेळी केंद्र सरकारकडून फक्त 5 हजार इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचं शिंगणे यांनी म्हटलंय.
या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जाते. राज्यात कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार 914 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 421 रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालाय. म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत. नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 1 हजार 59 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापठोपाठ पुण्यात 758, तर औरंगाबादेत 571 रुग्ण असल्याची माहितीही राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंडियन आयडल १२’ मध्ये पुन्हा येण्यास विशाल ददलानीने ‘या’ कारणामुळे दिला नकार
- डब्लुटीसीच्या फायनलसाठी कोहलीच्या प्रशिक्षकांची ‘या’ संघाला पसंती
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- अभिनेता जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा मॉडेलने केला आरोप
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
