🕒 1 min read
पुणे : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच आज फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी भाजप नेते व आमदार गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पवार-फडणवीस भेटीसह त्यांच्या जळगाव दौऱ्यावर भाष्य केलं आहे. ‘शरद पवार आजारी आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस भेटायला होते. पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले. त्यामध्ये राजकीय काहीही नव्हतं. त्यानंतर ते जळगावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत,’ असं उत्तर देत पाटील यांनी फडणवीस-खडसे भेटीवर अधिकचं भाष्य करणं टाळलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- ‘ठाकरे आणि पवारांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करुन मी त्या पूर्ण करुन घेईन’

