टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा राज्यभर धुराळा उडत आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसा प्रचाराला रंग चढत आहे. या प्रचारच्या काळात मात्र राज्यभरातील मोलमजुरी कामगारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मजूर पगारी कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आपली रॅली मोठी दिसावी, म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार धडपडत आहेत. त्यासाठी चक्क भाड्याने कार्यकर्ते बोलावले जात आहेत.
सध्या राज्यभरात भाड्याने कार्यकर्ते घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. ज्यात महिला असल्यास २५० ते ४०० रुपये आणि पुरुष असल्यास ३०० ते ५०० रुपये प्रति दिवस असा प्रत्येक रॅली, सभेसाठी दर सुरु आहे. याशिवाय हॉटेलमध्ये जेवणही कामगारांना दिले जात आहे. त्यामुळे दिवसभर मोलमजुरी करून जेवढी मजुरी मिळत नाही त्यापेक्षा जास्त पैसे फक्त दोन तासांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे मिळत असल्याचे काही कामगारांनी सांगितले.
येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान असल्याने सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. मोठमोठी मैदाने आणि वेळ पडली तर रस्त्यावरही नेते मोठ-मोठ्या सभा, रॅली भरवत आहेत. या रॅली आणि सभेमध्ये अंगावर रूमाल आणि हातात झेंडे घेऊन येणारे बहुतांश कार्यकर्ते हे भाड्याने आणले जाणारे पगारी मजूर आहेत. राज्यभरातील मजूर अड्यावरील कामगारांची प्रचार सभा आणि रॅलीसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यापासून मजूर अड्डा आता ओस पडू लागला आहे. दिवसभराचे काम करून जेवढे पैसे मिळतात, तेवढे एका प्रचारसभेत दोन तासांत मिळत असल्याने कामगार उमेदवारांच्या प्रचाराला जात आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात या मजुरांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182249296177090561?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182251968263159808?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

