टीम महाराष्ट्र देशा : कसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणाऱ्या मनसचे प्रमुख राज ठाकरे यांना विधानसभा निवडणूकीच्या प्रचारापूर्वी दबावाखाली आणण्याचे राज्यकर्त्यांंनी प्रयत्न सुरु केले आहेत. कोहीनूर मिल खरेदी प्रकरणात त्यांची सकतवसुली संचालनालयाकडून (ईडी)चौकशीच्या फेऱ्यात अडकविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोहीनूर सीटीएनएल कंपनीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याचा नुकताच जबाब घेण्यात आलेला आहे. आता येत्या आठवड्याभरात राज ठाकरे यांना चौकशीसाठी नोटीस जारी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. यावर आता राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत उत्तर दिल आहे.
मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही. तुमच्याकडून मी या बातम्या ऐकत आहे. मला ते आणखी काही हॅलो करायला घरी आले नाहीत, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं आहे. येत्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यासाठी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी ईडी चौकशीबाबतच्या प्रश्नाला आक्रमक उत्तर दिलं आहे. राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकमुखाने ईव्हीएमला विरोध केला आहे. ईव्हीएमला विरोध करत 21 ऑगस्टला सर्व विरोधकांनी मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे.
हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नसेल. कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह या मोर्चामध्ये नसेल, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. आम्ही महाराष्ट्रातील घराघरात जाऊन अर्ज भरुन घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगकडे अर्ज देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
पक्षांतराने खचून जाऊ नका, खंबीर राहा : पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
“भाजप बलात्काऱ्यांना पाठीशी घालतोय”
स्वाभिमानीचे दोन वाघ कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा
‘शिवसेनेत प्रवेश केला असला तरी पवारसाहेब माझ्या हृदयातचं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

