टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्षानं राज्यसभेतल्या सर्व खासदारांना आज व्हिप जारी केलं आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राज्यसभेत आजही चर्चा सुरू आहे. या विधेयकावर आज मतदान होणं अपेक्षित आहे. दहशतवादी कारवायांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून जाहीर करण्याची तरतूद या विधेयकात आहे.
दरम्यान, ही तरतूद घटनात्मक दृष्ट्या वैध नसल्याचं, काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते या विधेयकाच्या विरोधात राज्यसभेत बोलत होते. या तरतुदीमागे भाजपची पक्षपाती भूमिका असल्याची टीका काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना, गृहमंत्री अमित शहा यांनी, दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त लोक कायद्यातल्या पळवाटांचा शोध घेत, नवनव्या दहशतवादी संस्था स्थापन करत असल्याकडे लक्ष वेधलं. या आणि अशा कारवाया रोखणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं गृहमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर तुफान हल्लाबोल
इस्लाममध्ये लग्न हे एक कॉन्ट्रॅक्ट, सात जन्माच बंधन नाही : ओवेसी
शरद पवारांनी केला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित,अजीत दादांचं काय होणार ?
आझादी गोरो से भी ली अब चोरो से भी लेंगे ; जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

