टीम महाराष्ट्र देशा- भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. उत्तरप्रदेशातील अमेठीत भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये एका भाजप कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील २४ परगना परिसरात ही घटना घडली आहे.
उत्तर २४ पगना जिल्ह्यातील भाटापारा येथे रविवारी रात्री भाजप कार्यकर्ता चंदन शॉ याची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी चंदन शॉ याची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप आहे. या घटनेनंतर २४ परगना परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.दरम्यान, पोलिसांच्या मते, प्राथमिक चौकशीत या हत्येमागे कुठल्याही प्रकारचं राजकीय वैमनस्य असल्याचं आढळलेलं नाहीये.


