Share

महिलांची कुचंबणा; औरंगाबादेत नवे स्वच्छतागृह कुलूपबंद..!

Published On: 

औरंगाबाद: शहरात ४३ स्वच्छतागृह बांधण्यासाठी महापालिकेने १४ कोटी ९ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाची छाननी ड्रेनेज विभागाकडून झाल्यावर तो राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान या विभागाकडे मंजूरीसाठी पाठवला जाणार आहे. मात्र याआधी महापालिकेने औरंगपुरा भागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधले आहे. परंतु ते कुलूपबंदच आहे. त्याचा वापर केला जात नाही. त्या स्वच्छतागृहाच्या आजूबाजूला टपऱ्या असल्यामुळे स्वच्छतागृहात जाण्यासाठी महिला धजावत नाहीत.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या औरंगाबादमध्ये तुलनेने कमी आहे. महत्वाचे रस्ते, मुख्य बाजारपेठा या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची कुचंबना होते. त्यामुळे शहराची गरज लक्षात घेवून पालिकेने ४३ स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी १४ कोटी ९ लाख रुपये लागणार आहेत. मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणी, वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असलेले चौक, क्रीडांगणे आदींचा अंदाज घेऊन स्वच्छतागृहे बांधण्याचे नियोजन केले जाणार आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

तयार करण्यात आलेला प्रस्ताव पालिकेच्याच ड्रेनेज विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज विभागाकडे हा प्रस्ताव पडून आहे. याच संदर्भात माहिती देताना उपायुक्त सौरभ जोशी म्हणाले, स्वच्छतागृहांच्यासाठीचा प्रस्ताव तयार करुन ड्रेनेज विभागाकडे पाठवला आहे, अद्याप या विभागाकडून कोणताही अभिप्राय आला नाही. या आठवड्यात ड्रेनेज विभागाकडे पाठपुरावा करुन प्रस्ताव प्राप्त केला जाईल आणि तो स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागाला अंतिम मंजूरीसाठी पाठवला जाईल. प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यावर स्वच्छतागृह महापालिका बांधणार की बीओटीच्या माध्यमातून बांधून घेणार याचा निर्णय केला जाईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!