Share

Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”

Published On: 

पाटना – बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे.

भाजप पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल बिहारमध्ये पहिली सभा घेतली. “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं” असा नारा नड्डा यांनी गया येथील सभेत दिला.याशिवाय या निवडणुकीत बिहारी जनता पुन्हा एकदा नितीशकुमार आणि भाजप यांच्यावर विश्वास दाखवेल असा देखील दावा केला.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ आता भाजपन आणि कॉंग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील एकमेव नेत्याचा समावेश आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपाची सत्ता असलेल्या अन्य कुठल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही या यादीत समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!