Share

गणेशोत्सवात मुंबई, पुण्यात नवे निर्बंध ? मुख्यमंत्री निर्णय घेणार – मंत्री वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या हाहाकारामुळे गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. तर यंदा देखील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून साधेपणाने सण-उत्सव साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्यात मुंबई-पुण्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. अगदी देश-विदेशातून लोक हा उत्सव पाहण्यासाठी येत असतात.

मात्र यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने होणार असून या दोन शहरांमध्ये अधिक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. ‘मुंबई, पुण्यासह अनेक शहरात कोरोना वाढत असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. समोर सणासुदीचा काळ आहे. लोकांनी जास्त गर्दी करू नये, काही नवे निर्बंध लावण्यासाठी मुख्यमंत्री एक दोन दिवसात तज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेतील. काही नवे नियम लागू केले जाऊ शकतील, मात्र ते दोन तीन दिवसात निर्णय घेतले जातील. नाईट कर्फ्यु लावला जाणार नाही, तशी चर्चा ही आजच्या बैठकीत झालेली नाही,’ अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

सण-उत्सव नंतरही साजरे करू, आरोग्याला प्राथमिकता द्या – मुख्यमंत्री

‘ सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!