Share

अहमदनगर जिल्ह्यातील दुकानदारांसाठी खुशखबर… दुकाने खुली ठेवण्याबाबत नवी नियमावली

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यातील दुकानदारांसाठी खुशखबर आहे. लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योजकांना तसेच हातावर पोट भरणाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यातच पूर्वी पाच वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती.मात्र आता पूर्वी पाच वाजता बंद होणारी दुकाने आता सात वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहे. पूर्वी पाच वाजता दुकाने बंद होत असल्यामुळे अनेकांचे नुकसान होत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवीन निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील लॉकडाउनच्या आदेशाची ३१ ऑगस्ट रोजी मुदत संपली असल्याने दिनांक २ सप्टेंबरपासून नवे नियम लागू करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीे यांनी मंगळवारी जारी केला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यापूर्वी दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्याची मुदत दोन तासांनी वाढवली आहे.

याशिवाय नवीन नियमानुसार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणे यावर तसेच दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र बसणे यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. विवाह समारंभास ५० तर अंत्यविधीला २० जणांना प्रवेश देण्यात येणार आहे.

‘हा’ माजी क्रिकेटपटू दरीत कोसळला, शोधकार्य सुरु!

राज्यात काल एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित! तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुलाला कोरोनाची लागण!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!