Share

‘हा’ माजी क्रिकेटपटू दरीत कोसळला, शोधकार्य सुरु!

Published On: 

नाशिक : माजी रणजीपटू आणि महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन ते २५० फूट दरीत कोसळले. काल (१ सप्टेंबर) संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्याचं काम सुरु होतं. परंतु परिसरात गर्द अंधार असल्याने शोध आणि बचावकार्य थांबवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, आज पहाटेपासून पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात झाली आहे.

नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ट्रेकिंगसाठी इगतपुरी तालुक्यात आले होते. त्यांच्यासोबत काही मित्र होते. मानस हॉटेलच्या परिसरात ते आले असता भीमा 2 या रेल्वे पुला समोरील टेकडी वरून एका खोल दरीच्या ठिकाणी ते सेल्फी काढत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने ते 250 फूट खोल दरीत कोसळले. याठिकाणी असलेल्या डोहात ते पडले. यासंदर्भात इगतपुरी तहसिल कार्यालय आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंत घेणार राज्यपालांची भेट

शेखर गवळी यांनी नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात वेगळी छाप सोडली आहे. त्यांना ट्रेकिंग, योगा, फिटनेस, व्यायामाचा छंद आहे. महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे.

खुशखबर : राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरु होणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!