Share

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुलाला कोरोनाची लागण!

Published On: 

नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढत आकडा हा नवनवीन उच्चांक गाठत असतानाच सामान्य व्यक्तीपासून ते राजकीय नेते, मंत्री, लोकप्राधिनिधी व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाचा विळखा पडत असल्याचे दिसून येत आहे. आता, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पुत्रालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र आणि भाजप आमदार पंकज सिंह यांच्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. यानंतर, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंकज सिंह यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात काल एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित! तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या…

पंकज सिंह यांनी,  “कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी करुन घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला आयसोलेट करा आणि स्वतःची चाचणी करा” असे ट्विट करून आवाहन केले आहे.

‘हा’ माजी क्रिकेटपटू दरीत कोसळला, शोधकार्य सुरु!

पंकज सिंह यांच्यावर भाजपाच्या उत्तर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असून ते नोएडा मतदार संघातून आमदार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अनेक लोकप्राधिनिधींसह मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्री मंडळातील कमल राणी वरुण आणि मंत्री व माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे.

अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंत घेणार राज्यपालांची भेट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!