Share

राज्यात काल एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित! तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या…

Published On: 

मुंबई : राज्यात काल गणेशोत्सव साधेपणाने पार पडला. कोरोनाचे सावट सर्वच सणांवर कायम असून काल राज्यातील रुग्णसंख्येत १५ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून देशामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण काही प्रमाणात दिलासादायक असले तरी नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होणे देखील आवश्यक आहे.

काल, १५ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. राज्यात एकूण १ लाख ९८ हजार ५२३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १० हजार ९७८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.३२ % झाल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

‘हा’ माजी क्रिकेटपटू दरीत कोसळला, शोधकार्य सुरु!

दरम्यान, काल दिवसभरात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला. सद्या, १३ लाख ७९ हजार ५१९ नागरिक हे होम क्वारंटाईन असून ३६ हजार २० नागरिक हे संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंत घेणार राज्यपालांची भेट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!