नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावांमध्ये नवीन लाल कांद्यास सर्वाधिक ५१५१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. प्रतिवर्षी दसऱ्याच्या दिवशी व्यापारी लाल कांदा खरेदी करण्यास प्रारंभ करतात. त्याच पद्धतीने सुरू झालेल्या या प्रक्रियेत कांदा व्यापारी रामराव खंडेराव देवरे यांनी उमराणे येथील शेतकरी रणजीत अरुण देवरे यांचा माल ५१५१ रुपये इतक्या सर्वोच्च भावाने खरेदी केला.
अजून महिनाभर तरी लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कांद्याचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे या वर्षी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. त्याचा फटका लाल कांद्यालाही बसला. त्यामुळे बाजारात या कांद्याची आवक तशीही कमी आहे. सध्या उमराणे बाजार समितीमध्ये या कांद्याची जवळपास एक हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे.
त्यात सर्वात जास्त भाव हा ५१५१ मिळाला असून, सर्वात कमी भाव ११०० रुपये इतका मिळाला आहे. तर सरासरी २७०० रुपयांनी कांद्याची विक्री झाल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे यंदा इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. खरिपासह या भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. पण सध्या तरी लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

