Share

‘रस्त्यावर केलेली ही घाण कोण उचलतं?’ ; पाळीव प्राणी फिरवणाऱ्या सेलिब्रिटींना अभिनेत्याचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बऱ्याच बॉलीवूड सेलेब्रिटींकडे पाळीव प्राणी आहेत. ते नेहमीच आपल्या पाळीव प्राण्यांसोबत रस्त्यावर फिरताना दिसत असतात. बऱ्याचदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण या सेलिब्रिटींवर अभिनेता रोहित रॉय संतापला आहे. त्यानं सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.

रोहित रॉय ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हणाला, बॉलीवूड मधील सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जाताना दिसतं आहेत. त्यांचे अतिशय कूल लूक देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या ही हातात मला कधी प्लास्टिकची पिशवी दिसत नाही. मला आश्चर्य वाटतं की त्यांच्या पाळीव प्राण्यांनी केलेली ही घाण कोण उचलतं?’ असा परखड सवाल त्यानं या प्राणी मित्र सेलिब्रिटींना विचारला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रोहितच्या या ट्विटवर त्याचा मोठा भाऊ अभिनेता रॉनित रॉय यानं उत्तर दिलं आहे. ‘ही या लोकांची जुनी सवय आहे. यांनी केलेली घाण दुसऱ्यांना स्वच्छ करावी लागते.’ या दोघांच्या ट्विटवर नेटकरी देखील भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!